घाटकोपरच्या शिवाजी शिक्षण संस्था प्राथमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!" मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा " अभियानात तालुकास्तरावर प्रथम!

घाटकोपर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियानात घाटकोपर पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्था प्राथमिक विद्यालयाने URC-7, घाटकोपर तालुकास्तरावर १५० पैकी १२६ गुण मिळवून एन विभाग खाजगी अनुदानित मराठी माध्यम प्राथमिक शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत उज्ज्वल यश संपादन केले आहे. शाळेचा नियोजनबद्ध कारभार, स्वच्छ व सुंदर परिसर, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, इ. शिशुपासून सेमी इंग्लिश माध्यम, अद्ययावत क्रीडांगण व ओपन जीम, अद्ययावत भौतिक सुविधा, दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण, मूल्यवर्धन उपक्रम, डिजिटल शाळा, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या निकषांवर शाळेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत शासनातर्फे शाळेला रोख रू. ३ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या यशामागे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शरद फाटक साहेब यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पांडुरंग गांवकर, सचिव श्री. श्रीकांत नरे, खजिनदार श्री. विकास फाटक तसेच संस्थेचे इतर सर्व सदस्य यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा व सहकार्य लाभले होते. तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र बडवे सर व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. संतोष भारमळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व विभागांचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे यश साकार झाले. 

' हा सन्मान ' आमच्या सर्वांच्या सामूहिक कष्टांचा आहे. मिळालेले पारितोषिक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व शालेय सुविधांच्या अधिक बळकटीकरणासाठी वापरण्यात येईल,” अशी भावना मुख्याध्यापक श्री. रवींद्र बडवे सर यांनी व्यक्त केली. या दैदीप्यमान यशामुळे संपूर्ण घाटकोपर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामुळे शिवाजी शिक्षण संस्था परिवाराकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

रिपोर्टर

  • Pritam Tambe
    Pritam Tambe

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Pritam Tambe

संबंधित पोस्ट