वाटंगीची जान्हवी कांबळे जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम..

तोडकर ॲकॅडमी गडहिंग्लज यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लहान गटाच्या भाषण स्पर्धेत वाटंगी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु.जान्हवी विश्वास कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

सुमारे ९९ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे दोन्ही गटांमध्ये तिचे धडाकेबाज व हृदय स्पर्शी भाषण झाले.मान्यवरांनी तिचे खूप कौतुक केले.ॲकॅडमीचे प्रमुख मा.महेश तोडकर सर यांचे हस्ते तिला १५०० रु. ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सौ.स्नेहल पाटील,श्री. अर्जून हराडे,श्री.पुंडलिक केसरकर,श्री.राम कुंभार,श्री.जयवंत शेवाळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.तिला वर्गशिक्षिका श्रीमती रंजना हसुरे,तिचे वडील श्री.विश्वास कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक श्री.सुनिल कामत,सौ.अनिता कुंभार,श्रीम.अनुजा केने यांचे प्रोत्साहन लाभले तसेच शाळा व्यवस्थापन समितीची प्रेरणा मिळाली.

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट