नाशिक येथील डे केअर सेंटर शाळेचा कला महोत्सव जल्लोषात साजरा

ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक संचलित डे केअर सेंटर शाळेत अभिजात संस्कृतीचे जतन करत, सामाजिक जाणीवांना रुजवत ,ज्ञानवर्धिनी ने केलेला प्रवास म्हणजे प्रगतीचा चढता आलेख! कला, विज्ञान, तंत्रज्ञान,साहित्य  अशा चौफेर क्षेत्रात मध्ये ज्ञानवर्धिनीने आपला ठसा उमटवलेला आहे. हेच दाखवणारा पाऊलखुणा या कला महोत्सवाचा दिमाखदार सोहळा पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी श्री.अभय सुपेकर (संपादक सकाळ) आणि माजी विद्यार्थी डॉ.शंतनू सौंदाणकर (ऑडिओ लॉजिस्ट) तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.गोपाळ पाटील,सचिव डॉ मा.अंजली पाटील,सहसचिव मा.अनिल भंडारी तसेच सर्व संचालक पदाधिकारी,सर्व विभाग प्रमुख मुख्याध्यापक यांच्या हस्ते सरस्वती पूजन, वृक्ष पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.संस्थेचे स्वर्गीय अध्यक्ष मा.आप्पासाहेब उगावकर व संचालक स्वर्गीय सदस्य मा.वसंतराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या समन्वयक वासंती पाठक यांनी संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची घोषणा केली.

यावेळी प्रमुख पाहुणे मा.श्री अभय सुपेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी शाळा कार्यरत आहे.ही शाळा इतरांसाठीही अनुकरणीय आहे कारण ही प्रयोगशील शाळा आहे.विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ व दिशा,समृद्धता ही शाळा देते. 

यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे आणि शाळेचा माजी विद्यार्थी  डॉ.शंतनू सौंदाणकर यावेळी बोलताना त्यांनी  शाळेने स्वप्न पाहायला शिकवलं आणि ते स्वप्न मी पूर्ण केले आहे.या शाळेमुळेच मी घडलो आहे असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदने द्वारे करण्यात आली.कला महोत्सवामध्ये बालवाडी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला ,तसेच या कार्यक्रमासाठी पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

अभिजात ही संकल्पना घेऊन संस्थेच्या  स्थापने पासूनचा प्रगतीचा चढता प्रवास या सर्व कार्यक्रमातून मांडण्यात आला. *याअंतर्गत पर्यावरण आणि सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकी रुजवणारे उपक्रम संस्थेच्या सर्व विभागांमधून नृत्य, नाट्य, अभिनय अशा विविध कलात्मक पद्धतीने  सादरीकरण करून सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावर्षी ज्ञानवर्धिनी संस्थेची नवीन कार्यकारणी स्थापन करण्यात आली त्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.संस्थेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येतो यावर्षी प्राथमिक विभागाच्या अश्विनी नेमाडे, तसेच माध्यमिक विभागात कार्यरत असलेले जेष्ठ सेवक विलास साठे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.या संबंधीची भूमिका संस्थेच्या सचिव मा. डॉ अंजली पाटील यांनी विशद केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा.गोपाळ पाटील सर यांनी संवाद साधला की दरवर्षी होणारा कला महोत्सव हा ज्ञानवर्धिनीच्या परिवाराचा वार्षिक उत्सव आहे.  पालक हीच आमची मोठी ताकद आहे. तसेच सकाळ पेपर तर्फे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या   उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.याच वेळी अर्थ नागरि सहकारी पतसंस्थेच्या वतीने सुरू होणारी ज्ञानार्थ बालगोपाळ बचत ठेव योजना याबद्दलही त्यांनी माहिती दिली लहान वयातच मुलांना बचतीची सवय लागावी हा यामागचा उद्देश आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असलेल्या  वंदे मातरम या  प्रेरक राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा केदार, कल्पना चव्हाण, कांचन घुगे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

रिपोर्टर

  • Yashavant Gosavi
    Yashavant Gosavi

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Yashavant Gosavi

संबंधित पोस्ट