झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयास मागील वर्षी “भाडे व्यवस्थापन प्रणाली” उत्कृष्ट पद्धतीने राबविल्याबाबत राष्ट्रीय स्तरावर गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण 

स्कॉच समूह हा देशातील खाजगी कंपन्यांना १९९७ पासून धोरणात्मक सल्ले व मार्गदर्शन देणारा समूह असून खाजगी व सार्वजनिक तसेच शासकीय क्षेत्रातील विविध कंपन्या व सेवा संस्था यांच्या कामगिरीचे विविध पातळीवर सदर समूहाद्वारे मूल्यमापन केले जाते.

नवी दिल्लीतील सिल्व्हर ओक, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी १०३ वी स्कॉच परिषद पार पडली. सदर परिषदेमध्ये स्कॉच समूहमार्फत गत ४ महिन्यांमध्ये विविध क्षेत्रातील एकूण ३०० पेक्षा जास्त कंपनी / सेवा संस्था / शासकीय कार्यालय यांनी सादर केलेल्या सादरीकरणाचे मूल्यमापन करून निवडण्यात आलेल्या कंपनी / सेवा संस्था / शासकीय कार्यालय यांचा गुणगौरव करण्यात आला.

स्कॉच परिषदेत महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयास “नागरी केंद्रित डिजिटल सेवा (Citizen-Centric Digital Services)” या उपक्रमासाठी सर्वोच्च अशा ‘प्लॅटिनम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाला गोल्ड तर जिल्हा परिषद, अमरावती, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक, जिल्हा प्रशासन हिंगोली, महाराष्ट्र मोटार वाहन विभाग यांना सिल्वर पुरस्कार प्राप्त झाले आहे.  

        झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयास मागील वर्षी “भाडे व्यवस्थापन प्रणाली” उत्कृष्ट पद्धतीने राबविल्याबाबत राष्ट्रीय स्तरावर गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणामार्फत नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. हा पुरस्कार बृहन्मुंबई झोपडपट्टीवासियांच्या विश्वास, सहभाग व सहकार्याला समर्पित आहे. भविष्यातही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालय लोकाभिमुख व डिजिटल सक्षम सेवा पुरविण्यास कटिबद्ध राहील.

रिपोर्टर

  • Siddharth Khandagale
    Siddharth Khandagale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Siddharth Khandagale

संबंधित पोस्ट