सहा.शिक्षिका पूर्वा सकपाळ यांची मुंबईतून नवोपक्रम उपक्रमासाठी निवड

मा. शरद पवार Inspire फेलोशिप २०२५ (शिक्षण विभाग) अंतर्गत महाराष्ट्रातून आलेल्या ४७५ नवोपक्रम प्रस्तावांमधून केवळ ३० नवोपक्रमांची निवड करण्यात आली.यामध्ये मुंबईच्या घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगर येथे असलेल्या भैरव विद्यालयाच्या प्राथमिक विभागात कार्यरत असलेल्या सहा.शिक्षिका सौ. पूर्वा प्रमोद सकपाळ यांची नवोपक्रमासाठी निवड होणे ही अत्यंत कौतुकास्पद  व अभिमानाची बाब आहे.

रविवारी नरिमन पॉईंट येथे पार पडलेल्या फेलोशिप प्रदान सोहळ्यातआदरणीय मा. शरद पवार साहेब व खासदार मा. सुप्रिया सुळे मॅडम यांच्या शुभहस्ते ही फेलोशिप प्रदान करण्यात आली. श्रीम. पूर्वा सकपाळ  यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. त्यामुळे सत्कारमूर्ती पूर्वा सकपाळ यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

रिपोर्टर

  • Siddharth Khandagale
    Siddharth Khandagale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Siddharth Khandagale

संबंधित पोस्ट