कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाच्या शिष्टमंडळाची मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयास अभ्यास भेट.. प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांना, उपक्रमांना प्रत्यक्ष भेट व पाहणी.

मुंबई, दिनांक ९ सप्टेंबर २०२५  : कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाच्या संचालक मंडळाने आणि अधिकाऱ्यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईने राबवलेल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी आज दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईतील वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई कार्यालयाला भेट दिली.कर्नाटक राज्यात पंतप्रधान आवास योजना (शहरी) आणि इतर राज्य गृहनिर्माण योजनांखालील गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि आगामी PMAY 2.0 अंतर्गत PPP मॉडेलचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी ही अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाच्या संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या  शिष्टमंडळाने प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांना आणि उपक्रमांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईच्या अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक संवाद साधत त्यांनी PPP मॉडेलच्या अंमलबजावणी प्रक्रियेची माहिती घेतली.

रिपोर्टर

  • Siddharth Khandagale
    Siddharth Khandagale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Siddharth Khandagale

संबंधित पोस्ट