जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासानिक बेदरकार कारभार संदर्भात लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारी २०२६ रोजी आमरण उपोषण -नितीन हरमळकर

फोंडाघाट - (प्रतिनिधी) दिनांक 13/1/2026 या बाबत वृत्त असे की कार्यालयीन पत्र जावक क्रमांक/ लिपिक नियुक्त्या/ 06 दिनांक 13/02/2006 अनुकंपा तत्त्वावर लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन त्यांना नियुक्तीपत्र देऊन सेवेत हजर करून घेतले आहे सदर आदेशातील नमूद श्री संभाजी नामदेव खाडे सध्या तहसील कार्यालय कणकवली येथे कार्यरत असून सदर कर्मचाऱ्यांची नेमणूक ही अनुकंपा तत्त्वावर झालेली असल्याने याबाबत खातर जमा करण्यासाठी जानेवारी 2004 ते डिसेंबर 2010 अखेर अनुकंपा नियुक्ती प्रतीक्षा धारकांच्या नोंदवहीची प्रत माहिती अधिकार अंतर्गत मागणी करून घेतली असता त्यात श्री खाडे यांच्या नावाचा यादीमध्ये समावेश दिसून येत नाही या वास्तव त्यांनी सादर केलेल्या अनुकंपाखाली नोकरी मिळविण्यासाठीचा प्रस्तावाची मागणी केली असता
सदर माहिती आढळून येत नाही असे कार्यालयाकडून करण्यात आले. सदर कर्मचाऱ्यांची सेवेची संबंधित कागदपत्रे आढळून येत नाही असे लेखी स्वरूपात हरमलकर यांना कळविण्यात आले आपल्या शंकेचे निरसन करावे अशी विनंती वजा मागणी केली असता त्री सदस्यिय चौकशी समिती जून 2025 मध्ये नेमली असल्याबाबत दोन महिन्यानंतर हरमलकर यांना ऑगस्ट महिन्यात कळविण्यात आहे तदनंतर तात्कालीन जिल्हाधिकारी श्री पाटील साहेब व आता कार्यरत जिल्हाधिकारी मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ठोस कार्यवाही करावी अशी विनंती केली पण आज अखेर पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.सतत पाठपुरावा करुनही प्रशासन गांभीर्याने दखल न घेतापाठिशी घालत आहे,त्यामुळे प्रशासनाकडून दखल घेत नसल्यामुळे लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारत आहे .असे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, पालकमंत्री महोदय, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, पोलीस स्टेशन, सिंधुदुर्ग, यांना कळविण्यात आले.
उपोषणातील मागण्या
१)नेमण्यात आलेल्या चौकशी समिती अहवाल एक महिन्याच्या कालमर्यादेत लेखी स्वरूपात द्यावा.2) सरकारी दस्तऐवज गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नियमाधीन कारवाई करावी.3) संबंधित जनहित माहिती अधिकारी श्री.अनिल पवार यांचे वर सरकारी कामात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात यावा व जबाबदारी निश्चित करून नियोमोचित कार्यवाही करावी अशी मागणी यांनी यावेळी केली.

रिपोर्टर

  • Rajesh Shirodkar
    Rajesh Shirodkar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rajesh Shirodkar

संबंधित पोस्ट