विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी समाज - संजय देसाई अध्यक्ष शेतकरी संघटना(श्री सुरेश शिंगटे फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव)
आजरा - शिक्षक हे केवळ नोकरी करत नाहीत तर ते समाज घडवण्याचे महान कार्य करत असतात . मुलांच्या आयुष्याला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य हे शिक्षकाकडून होत असते त्यामुळे खऱ्या अर्थाने देशाला सबळ बनवायचे असेल तर ते शिक्षकच बनवू शकतात म्हणून अशा शिक्षकांचा समाजाने नेहमी गौरव केला पाहिजे . तसेच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आयुष्य खर्च करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी समाजाने राहिले पाहिजे असे उद्गार शेतकरी संघटनेचे नेते श्री देसाई यांनी व्यक्त केले .ते वाटंगी येथील श्री सुरेश कृष्णा शिंगटे फाउंडेशनने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .
सन 2024-25 सालातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा शिंगटे फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात फाऊंडेशनचे मार्गदर्शक शिवाजी बोलके यांनी फाऊंडेशनच्या कार्याची ओळख करून दिली . आपल्या मनोगतातून फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.सुरेश शिंगटे यांनी सेवानिवृत्ती नंतर समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून गुणवंत विद्यार्थी - मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार,वृक्षारोपण चळवळ,दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य,एस.टी.बससाठी बोर्ड,आपदग्रस्तांना मदत करत असल्याचे सांगितले.तर ज्या शिक्षकांनी स्वतःचे हित न पाहता केवळ विद्यार्थी घडवणे हेच ध्येय समोर ठेवले अशा व्यक्तिमत्त्वांचा आज येथे फाउंडेशनच्या वतीने सन्मान होत आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे शिवराज उद्योग समूहाचे प्रमुख श्री . शिवाजी गिलबिले यांनी मत व्यक्त केले.फाउंडेशन नेहमीच गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्याचे पवित्र कार्य करीत आले आहे.कारण हा सत्कार केवळ गौरव नसून तो पुढील पिढीसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे असेही ते म्हणाले.शिष्यवृत्ती मार्गदर्शक रवींद्र दोरुगडे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे शाखाधिकारी सुरेश सावंत,यांनीही फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला.शिष्यवृती मार्गदर्शक बाबासाहेब पाटील, अनिल बामणे,विवेकानंद साबळे,विश्वास येजरे,शिवाजी बोलके,संजीव नाईक,निलीमा पाटील,सुप्रिया पाटील,सुरेखा कांबळे,अजित चौगुले, तसेच वाटंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील कामत यांचा आणि शिष्यवृती धारक विद्यार्थी तसेच वाटंगी शाळेतील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सन्मानचिन्ह,डायरी, पेन,फळझाडे देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सरपंच सौ.इंदूबाई कुंभार,संतोष बिरजे,बाबुराव नार्वेकर,किसन देसाई यांच्यासह तालुक्यातील शिक्षक,पालक,विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती डेळेकर तर आभार प्रदर्शन सागर शिंगटे यांनी केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
Testing
- 15 March, 2024
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Rupesh Adolikar