नागपूर अधिवेशनातील वनमंत्री मा. ना. श्री. गणेश नाईक यांची महत्त्वपूर्ण भेट
नागपूर येथील अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. ना. श्री. गणेश नाईक साहेब यांची भेट घेण्याचा योग आला या भेटीत राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील वाड्या-वस्तीतील नागरिकांचा ज्वलंत प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले. जंगल हद्दीतून जाणारा रस्ता पक्का नसल्याने नागरिकांना गारगोटी मार्गे तब्बल ७० कि.मी.चा फेरा मारावा लागत आहे, ही गंभीर बाब त्यांच्या समोर मांडली.
वाकीघोल परिसरातील नागरिकांच्या हालअपेष्टा लक्षात घेऊन राजापूर ते चाफोडी रस्ता होण्यासाठी वन विभागाकडे दिलेल्या प्रस्तावावर लवकर निर्णय घेणे आवश्यकअसल्याचे सांगितले. यावर मा. वनमंत्री साहेबांनी सकारात्मक सहमती दर्शवली.तसेच दाजीपूर अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन, नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि वन्यप्राण्यांमुळे शेती व जीवितास होणाऱ्या धोक्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.मा. वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी सर्व प्रश्नांची गंभीर दखल घेत लवकरात लवकर मार्ग काढण्याची ग्वाही दिली.अशी माहिती श्री. संभाजी यशवंत आरडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, कोल्हापूर ग्रामीण यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
Testing
- 15 March, 2024
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Rupesh Adolikar