सिंधुदुर्गच्या बॉडीबिल्डर आणि फोंडाघाट फ्युचर फिट जिमचे अमित कदम जागतिक स्पर्धेत सिल्वर विजेता !..बँकॉक मध्ये भारताचा तिरंगा फडकला ! फोंडाघाट मध्ये अमितच्या अभिनंदनाचा जल्लोष !

फोंडाघाट -- येथील फ्युचर फिट जिमचे संचालक- खेळाडू अमित कदम यांनी थायलंड मधील बँकॉक येथे, नुकत्याच पार पडलेल्या "वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिप" स्पर्धेत भारताचा प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. आणि फोंडाघाट गावासह सिंधुदुर्ग जिल्हा सह भारताचा झेंडा कॅनडामध्ये फडकवत, सिल्वर मेडलची कमाई केली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील २५ देशाचे, अव्वल दर्जाचे बॉडी बिल्डर्स सहभागी झाले होते. आपली ताकद, मेहनत, परिश्रम, अचूक सराव आणि प्रभावी परफॉर्मन्सच्या जोरावर अमित यांनी अत्यंत कठीण आणि तगड्या स्पर्धेत, जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा उंचावला.फोंडाघाट सारख्या ग्रामीण परंतु विकसनशील गावात, त्यांनी युवाईला एकत्र करत शरीरसौष्ठव चे महत्त्व पटवून, स्टॅन्ड समोर फ्युचर फिट जिमची स्थापना केली. आज अनेक युवक- युवती यामध्ये अभ्यासपूर्ण पारंगत होत आहेत. सुमारे पंधरा-वीस वर्षाच्या अथक मेहनतीचे, शिस्तीचे, सरावाचे फळ मिळवतांना कठोर परिश्रम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि परिणामकारक प्रशिक्षणाच्या जोरावर हे असाद्य काम त्यांनी पूर्णत्वास नेले. आणि जिम मधील खेळाडूंसाठी आदर्श निर्माण केला आहे. स्पर्धेपूर्वी त्यांनी विशेष डायट, नियमित वर्कआउट, पोझिंग सराव आणि मानसिक तयारी यावर लक्ष केंद्रित करून, आपले ध्येय गाठले आहे.

छोट्याशा गावातून या तरुणाने मिळवलेले हे आंतरराष्ट्रीय यश, ही फोंडाघाटच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि गावासह जिल्ह्याचे नाव उंचावणारी बाब आहे. त्यामुळे गावातील खेळाडू,क्रीडाप्रेमी यामध्ये उत्साहाचे वातावरण असून, फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रात युवाई ला करिअर करण्याची प्रेरणा मिळाली आहे .कॅनडातून अमितच्या येथील आगमनानंतर, त्याचा भव्य सत्कार, विशेष कार्यक्रमाद्वारे आयोजन करण्यात आले आहे..

रिपोर्टर

  • Rajesh Shirodkar
    Rajesh Shirodkar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rajesh Shirodkar

संबंधित पोस्ट