4 डिसेंबर रोजी फोंडाघाट ब्रह्मनगरी गावठाण येथील जागृत देवस्थान ब्राह्मणेश्वर मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी :  घोणसरी प्रकल्पग्रस्तांच्या विस्थापितांनी स्वर्गीय दाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत कष्टातून उभारलेले जागृत देवस्थान श्री देव ब्राह्मणेश्वर मंदिर ब्रह्मनगरी गावठाण फोंडाघाट येथील या देवस्थान श्री देव ब्राह्मणेश्वर मंदिराचा २५ वा वर्धापन दिन तथा रौप्य महोत्सवी सोहळा तारीख ४ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे यानिमित्त बुधवार दिनांक ३डिसे. व गुरुवार दिनांक ४ डिसेंबर रोजी धार्मिक,अध्यात्मिक,सांस्कृतिक,क्रीडा या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक ४ रोजी ८ वाजता गेल्या पंचवीस वर्षात देवस्थानाशी निगडित योगदान देणाऱ्यांसाठी कृतज्ञतेचा सुवर्णसोहळा व त्यावर विशेष चित्रफित सादर होणार आहे. 

 बुधवार दिनांक ३ रोजी सायंकाळी ४ ते 6 विविध वयोगटासाठी खेळ स्पर्धा,सायंकाळी ६ ते ७ पारंपारिक लाठीकाठी व साहसी खेळ ८ ते १० कृतज्ञतेचा सुवर्णसोहळा व चित्रफित प्रदर्शन आणि रात्री १० वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ९ ग्रंथ वाचन ९ ते १० ब्राह्मणेश्वर अभिषेक,११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, १ ते ३ महाप्रसाद,सायंकाळी ४ ते ८ पालखी मिरवणूक,रात्री ९ वाजता महाराष्ट्राची लोकधारा (स्थानिक कलाकार) व ११ वाजता बालकृष्ण दशावतारी नाट्य मंडळ कोलम- मालवण यांचे महान पौराणिक नाटक होणार आहे.या सोहळ्यात चित्रफीत संयोजन तनिष हिंदळेकर आणि उन्मेषा बांबरकर तर संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन करुणा चिंदरकर,सदानंद हिंदळेकर,ज्ञानेश चिंदरकर,जयवंत सावंत आणि सर्व सहकाऱ्यांनी नियोजन बंद केले आहे.तरी संपूर्ण सोहळ्यास भाविकांनी सहभागी व्हावे असे आव्हान संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Rajesh Shirodkar
    Rajesh Shirodkar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rajesh Shirodkar

संबंधित पोस्ट