कणकवलीत रणधुमाळी सत्ताधारी पक्ष भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी,कणकवलीत संदेश पारकर यांचा झंझावात प्रचार


 सध्या कणकवली येथे दिनांक 2तारीखला होवू घातलेल्या नगरपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत, आरोपांच्या फैरी दोन्ही बाजूंनी होत आहेत,एका बाजूला फक्त पालकमंत्री व निष्ठावंत कार्यकर्ते तर दुसरीकडे सर्व पक्षीय एकत्र येत मोर्चे बांधणी करून समोरच्याला खिंडीत पकडण्याची मोहीम.या मोहीम मध्ये पालकमंत्री यांचे थोरले बंधू कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे,राजन तेली,संजय आंग्रे दिवसरात्र मेहनत घेत आहेत,  नगराध्यक्ष समिर नलावडे यांचा विकास कामे केलेल्या कामांवर मत मागत आहेत,तर दुसरीकडे नगराध्यक्षाचे उमेदवार संदेश पारकर हे आत्तापर्यंत कणकवली येथे झालेला भ्रष्टाचार व आपली नगराध्यक्ष म्हणून शेवटची निवडणूक अशी भावनीक हाक या जोरावर निवडणूक होत आहे,मालवण येथे स्थायिक आमदार यांनी टाकलेल्या छाप्यात लक्ष्मी दर्शन त्यामुळे पोलीसांचा जागोजागी तपासणी या कारणांमुळे मतदार नाराज होणार असे दिसत आह,

सध्या कणकवली येथे निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना शहर विकास आघाडी चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांची आघाडी दिसून येत आहे, कणकवलीची जनता सत्ताधारी पक्षाला कंटाळली असून यावेळी परिवर्तन अटळ आहे तसेच प्रत्येक मतदारसंघात पोहचणे निशाणी सांगणे, विकास कामे यांची माहिती देणे इ,भागावर भर देत आहेत. स्वतः ग्राउंड लेव्हला उतरुन काम करत आहेत,या वयातही उत्साह वाखण्या जोगा आहे. कार्यकर्ते यांची उत्तम साथ व मतदारांचा विश्वास या जोरावर सत्राच्या सत्रा नगरसेवक निवडून येणार असे ठामपणेसांगितले.

रिपोर्टर

  • Rajesh Shirodkar
    Rajesh Shirodkar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rajesh Shirodkar

संबंधित पोस्ट