विष्णू गायकवाड जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

कारेगाव - कारेगाव येथील जिल्हा परिषद उच्च श्रेणी मुख्याध्यापक विष्णू भगवान गायकवाड यांचा जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गर्दे वाचनालय सभागृह  बुलढाणा या ठिकाणी माजी राष्ट्रपती महामहीम डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब यांच्या जन्मदिनी दिनांक 15 ऑक्टोबर ला जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कारेगाव येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री विष्णु भगवान गायकवाड यांना माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमान गुलाबराव खरात साहेब यांचे शुभ हस्ते सपत्नीक जिल्हा शिक्षक गौरव  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी माननीय आमदार संजयभाऊ गायकवाड साहेब ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम.मोहन साहेब,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार साहेब,शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब, तसेच विविध विभाग प्रमुख, गटशिक्षणाधिकारी श्रीमान कुंभारे साहेब,  उमेशजी जैन साहेब व सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विशेष म्हणजे श्री विष्णू गायकवाड सर हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमान भगवानराव गायकवाड यांचे चिरंजीव आहेत . हा पुरस्काराचा वारसा कायम ठेवल्या बाबतचा उल्लेख याप्रसंगी आवर्जून करण्यात आला. माननीय गटविकास अधिकारी देशमुख साहेब, श्रीमान रवी भाऊ मापारी, बी. आर. सी. कार्यालय लोणार येथील सर्व कर्मचारी, श्रीमान परमेश्वर गायकवाड श्रीमान गजानन गायकवाड ,श्री संजयजी डव्हळे ,श्री. भगवानराव खराटे, केंद्र  प्रमुख सुनिल जाधव सर, श्री.भागवत गायकवाड श्री. सौरभ गायकवाड, परिवारातील सर्व सदस्य, उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघटनेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे सर्व पदाधिकारी तसेच  कारेगाव येथील सरपंच विश्वास केंधळे, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भागवतराव चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सर्व सदस्य. नातेवाईक ,मित्रपरिवार यांनी या सन्मानाबद्दल सरांचे  अभिनंदन केले आहे.

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट