जिल्हा परिषद शाळांमधील पाण्याच्या टाक्या बनल्या शोभेच्या वस्तु

    कारेगाव - लोणार तालुक्यामधील कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळांमधील पाण्याच्या टाकी ही दोन ते तीन वर्षे पासुन शाळेमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधण्यात आली होती. दोन टाकक्या पेंकी एक  टाकी नविन बांधण्यात आली होती. ती टाकी अजुनही वापरात आलेली नाही.तसेच जुणी टाकी ही गळत होती म्हणून नविन टाकी बांधण्यात आली होती.पण तीही सुद्धा ठेकेदाराच्या मन-मानी कारभारामुळे आजुन पर्यंत वापरात आलेली नाही आणि ती पाण्याची टाकी सुद्धा गळत आहे त्या टाकीला नळ सुद्धा फिट केलेला नाही तरी या टाकीचे इंजिनीयरने सुद्धा पाहणी करुन त्याचा आव्हाल हा पंचायत समितीकडे सादर करण्यात आलेला होता.आणि या अशा टाकीची एम.बी.-सी-सी सुद्धा तयार होते. पण आजुन सुद्धा पाण्यासाठी टाकी ही वापरात आलेली नाही. तरी या विषयाकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न शाळा समिती आणि गावकऱ्यांना पडलेला आहे. शाळा समितीने वारंवार टाकीचा विषय ग्रामपंचायत/पंचायत समिती ठेकेदार यांना सुचना माॅसेजेस दिलेले आहेत. तरी सुद्धा या टाकीचे काम पूर्ण होऊन सुद्धा टाकी ही वापरात येत का नाही ?                                                        आणि जुणी टाकी ही निष्कृष्ट झाल्यामुळे ती टाकी एखाद्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही ? ही टाकी पाडण्यासाठी शाळेने ग्रामपंचायतला पत्र सुद्धा दिलेले असुन ती टाकी अजुनही पाडण्यात आलेली नाही. व नविन टाकीच्या खाली सुद्धा भरपूर असे खाली ग्राॅंऊड ठेवण्यात आले असल्यामुळे त्या टाकीच्या पाजरण्यामुळे त्या टाकी खाली साप/विंचू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या विषयाकडे सुद्धा लक्ष देण्यात यावे या टाकीकडे ग्रामपंचायत/पंचायत समिती हे जाणुन बुजुन हेतु परस्पर दुर लक्ष करत आहेत.शाळेमध्ये पाण्याची टाकी आसुन सुद्धा टाकीत पाणी साठवल्याजात नसल्यामुळे शाळेमधील विद्यार्थी हे आप-आपले पाणी आणण्यासाठी शाळा सोडून पाणी आणतो म्हणून काही विद्यार्थी शाळे बाहेरच फिरत असतात .

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट