सोमठाणा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात आले

कारेगाव :- लोणार तालुक्यातील सोमठाणा /खापरखेडा गट ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद बुलढाणा पंचायत समिती लोणार अंतर्गत ग्रामपंचायत सोमठाणा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात आले लोणार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत सोमठाणा येथील सरपंच सौ.सुमित्रा परसराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सोमठाणा खापरखेडा येथील नागरिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे गावात विकासाचा झरा वाहणार असल्याचे गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले पंचायत समितीचे आपले सरकार सेवा केंद्राचे तालुकाप्रमुख अनिस सर यांनी प्रोजेक्टर लावून आपला गाव सुंदर व सुजलाम कसा ठेवायचा व ही योजना कशी राबवायची याबाबत मार्गदर्शन केले तदनंतर ग्रामविकास अधिकारी किशोर भाग्यवंत यांनी गावाला सहकार्य करण्याचे आश्वासित केले गावकरी ते राव न करी अशा शब्दातुन जनतेला संबोधले गावातील युवा नागरिक अनंता शिंदे यांनी गावकऱ्यांच्या वतीने आम्ही संपूर्ण सहकार्य प्रशासनाला करू असे सांगितले सरपंच पुत्र राहुल भाऊ शिंदे यांनी 18 महिन्याच्या कार्यकाळात विविध विकास कामे केल्याचा आढावा सादर केला व यापुढेही गावकऱ्यांनी सहकार्य करावे हि भावना व्यक्त केली आणखी पुढच्या काळात आपल्याला भरपूर असे विकासकामे पाहायला मिळतील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले असेच कामे प्रगतीपथावर ग्रामपंचायतीने करावी. गावकरी मिळून ही योजना आपण आपल्या गावात आणल्याशिवाय राहायचं नाही असे सरपंच पुत्र यांनी सांगितले तसेच गट विकास अधिकारी यांना शब्द दिला आहे आम्ही गावकरी मागे हटणार नाही आम्ही ही योजना पूर्णपणे आमच्या गावाच्या विकासासाठी घेऊच असे गावकऱ्यांमधून एक सुर निघाला उपस्थितांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप राठोड. .पंचायत समितीचे इंजिनीयर, तलाठी, आरोग्य सेवक  गावातील ज्येष्ठ नागरिक दादाराव पाटील शिंदे माजी पंचायत समिती सदस्य ,तसेच गावातील माजी सरपंच उपसरपंच शाळा समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, दोन्ही गावातील तंटामुक्ती अध्यक्ष ,जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सर्व बचत गटांच्या अध्यक्ष सचिव ,व बचत गटांच्या महिला ,गावातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी ज्येष्ठ नागरिक महिला युवक सर्व उपस्थित होते

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट