एटीएमद्वारे दुधना पतसंस्थेच्या हातून उत्तरोत्तर जनसेवा घडत राहो- प्राचार्य रंगनाथ खेडेकर

 आज दि. १७ सप्टेंबर २०२५ वार बुधवार रोजी  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभ मुहूर्तावर दुधना पतसंस्थेचे मुख्य कार्यालय वाटूर येथे एटिएम सुविधा शंभूमहादेव महाविद्यालय वाटूर चे प्राचार्य रंगनाथ खेडेकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली . तत्पूर्वी उदघाटक म्हणून लाभलेले शंभू महादेव महाविद्यालयचे प्राचार्य रंगनाथ खेडेकर आणि दुधना पतसंस्थेचे उपाध्यक्ष मदनराव हजारे यांचे हस्ते फित कापून एटीएम सेवेचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी विजय ग्याळ, अनिल चव्हाण सह शंभू महादेव कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद तसेच सभासद खातेदार यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. एटिएमच्या सुविधेमुळे परिसरातील सर्व खातेदारांना विनामूल्य कुठल्याही बँकेचे पैसे काढता येतील तसेच ट्रान्स्फर देखील करता येतील. वाटूर परिसरातील जास्तीत जास्त खातेदारांनी या विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केले. एटीएम लोकार्पण सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या जयेश मोहिते, अरुण देशपांडे,पवन बुरकुल, कृष्णा जाधव, वैभव घेंबड, रवी काळे आदीनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

रिपोर्टर

  • Ramkisan Bodakhe
    Ramkisan Bodakhe

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Ramkisan Bodakhe

संबंधित पोस्ट