एका शेतकऱ्याच्या दोन मुलांची गरुड झेप मोठा मुलगा राधेश्याम सुदर्शन जाधव आयआयटी तर छोटा मुलगा शुभम सुदर्शन जाधव एनआयटी

कारेगाव- लोणार तालुक्यामधील ग्रामीण भागातील सरस्वती या गावात राहणाऱ्या ऐका शेतकऱ्याच्या मुलांनी आपले नाव व गावांचे उज्वल केले अशा मुलांसाठी अनेक समाजीक राजकीय क्षेत्रातील मंडळीने यांच्या सत्काराचा कार्यक्रम लोणार येथे आयोजित करण्यात आला होता. अनेक कंपन्यांनी करोडहून अधिक पॅकेज केले. आय.आय.टी.एन राधेश्यामला ऑफर , दोघं भावांनी शिक्षणात चांगली मजल मारल्यामुळे  त्यांच्या पालकांचा अनेक मान्यवरांनी केला सत्कार. सत्कार करायला आलेल्या मान्यवरांना त्यांचे वडील सुदर्शन जाधव हे म्हणाले की माझ्या ऐवजी माझ्या भावाचा व बहिणीचा सत्कार करा कारण  घडणारे इथं नाहीत परंतु त्यांना घडविणारे माझा भाऊ अमोल व बहीण जया या ठिकाणी आहे ह्या दोघांनमुळेच माझी मुले घडले हे सुदर्शन जाधव चे उद्गार ऐकून मान्यवरांच्या डोळ्यात आले पाणी सत्कार समारंभ मध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर , प्रकाश भाऊ मापारी, डॉक्टर खुशाल भाऊ मापारी, बळीभाऊ मापारी, संतोष भाऊ मापारी , राजूभाऊ इंगळे ,  दिलीप काका जाधव, विजुभाऊ जाधव, नीरज भाऊ रायमुलकर , एपीआय इंगोले साहेब, सावित्रीबाई विद्यालयाचे अध्यक्ष विनोद भाऊ भगत,  तहसीलदार डोळे साहेब,  राजू मामा पळसकर, सुनील भाऊ लहाने, कृष्णा भाऊ सांगळे ,भागवत भाऊ जाधव, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट