Breaking News
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत सन 2023-24 व सन २०२४ -२५ मध्ये गुणानुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय आलेल्या शाळांचा गुणगौरव समारंभ शिक्षण विभाग पंचायत समिती लोणार यांचे वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी श्रीमान उमेशजी देशमुख साहेब हे होते.प्रमुख अतिथी म्हणून श्री.भूषण पाटील तहसीलदार लोणार,श्रीमती वऱ्हाडे मॅडम मुख्याधिकारी नगरपरिषद लोणार,श्री. धनंजय इंगळे ठाणेदार लोणार,शरद घुगे सहाय्यक गटविकास अधिकारी लोणार,श्री जंगलसिंह राठोड साहेब गटशिक्षणाधिकारी लोणार,श्री.पीएम मापारी साहेब माजी गटशिक्षणाधिकारी,श्री.गजानन कुंभारे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी,श्री.सतीश कापुरे साहेब प्रशासन अधिकारी लोणार हे उपस्थित होते.निवड झालेल्या शाळांना सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे यावेळी निवड झालेल्या गावचे सन्माननीय सरपंच,उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,संस्थेचे अध्यक्ष,सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan