मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन योजना, बृहन्मुंबई कार्यालयाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत येणाऱ्या २२ सेवा शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या असून, त्या सर्व सेवांचा आता नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. महेंद्र कल्याणकर, (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या ऑनलाइन सेवेमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी संबंधित नागरिकांच्या समस्या व प्रश्नांचे निराकरण अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या सेवांमध्ये ना हरकत प्रमाणपत्रे व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करुन देण्याचा समावेश आहे. या ऑनलाइन सुविधेमुळे प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
२२ सेवांची यादी
रिपोर्टर
Siddharth Khandagale
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Siddharth Khandagale