Breaking News
सोलापूर, दि. ०६/०८/२०२५ :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र चरित्राचे विकृतीकरण करणाऱ्या आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या “खालिद का शिवाजी” या चित्रपटावर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील सर यांना निवेदन सादर केले.या निवेदनात नमूद केल्यानुसार, “खालिद का शिवाजी” या चित्रपटात अनेक तथ्यहीन दावे करून इतिहासाचा विपर्यास केला जात आहे. त्यातील मुख्य भ्रामक दावे म्हणजे :
1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते – हा दावा पूर्णपणे अप्रामाणिक आहे. कोणत्याही अधिकृत शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजात अशा टक्केवारीचा उल्लेख नाही.
2. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते – हा देखील दावा आधारहीन असून, महाराजांचे अंगरक्षक हे निष्ठावान, स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे आणि हिंदू धर्मातील होते. येथे धर्म नसून ‘कर्तृत्व व निष्ठा’ हाच मुख्य निकष होता.
3. रायगडावर मस्जिद असल्याचा दावा – रायगडावर कोणतीही मस्जिद नसून, यासंदर्भात कोणत्याही ऐतिहासिक दस्तावेजात किंवा पुरातत्त्व खात्याच्या नोंदीत असा उल्लेख नाही.
मारुती सुरवसे यांनी अधिकाऱ्यांना बोलताना म्हणाले “‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे जाणीवपूर्वक विकृतीकरण केले गेले आहे. ३५% मुस्लिम सैनिक, ११ मुस्लिम अंगरक्षक, आणि रायगडावर मस्जिद असल्याचे दावे हे पूर्णपणे तथ्यहीन, भ्रामक आणि ऐतिहासिक पुराव्यांशिवाय समाजात तेढ निर्माण करणारे आहेत. शिवकालीन बखरी, पत्रव्यवहार, आणि ब्रिटिश-डच प्रवासवृत्तांतांमध्ये यासंदर्भात कोणतेही उल्लेख नाहीतर हे सर्व दावे महाराजांच्या चरित्राची बदनामी करणारे असून, आम्ही याचा तीव्र निषेध करतो. अशा चित्रपटांवर तात्काळ बंदी आणून, इतिहासाच्या पवित्रतेचे रक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे.या पार्श्वभूमीवर संघटनेने खालील मागण्या केल्या आहेत :
1. “खालिद का शिवाजी” या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी.
2. चित्रपटातील सर्व आशय व संवादांची सेंसर बोर्डमार्फत नव्याने तपासणी करण्यात यावी.
3. इतिहासाच्या विकृतीकरणासाठी जबाबदार असलेल्या लेखक, दिग्दर्शक व निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
4. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे.
5. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राची विटंबना टाळण्यासाठी विशेष कायदा किंवा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावी.
या निवेदना वेळी संस्थेचे पदाधिकारी राहुल बाके, कार्तिक संगमनवरु, राघवेंद्र मेल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
संपर्क : मारुती सुरवसे
संस्थापक अध्यक्ष, शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान
मो. 9503579696
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Pooja Dhanve