Breaking News
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे ऊर्जा केंद्र असून देशासह जगभरातील कोट्यावधी लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे राजे असे म्हटले जाते एखाद्या राजाला अनेक उपाध्याय मिळाले असतील परंतु रयतेचा राजा अशी उपाधी मिळालेले जगात केवळ एकच राजे होऊन गेले आणि ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज देशासह जगभरातील प्रत्येक युवा बांधवांचा आदर्श आणि ऊर्जा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज आहे शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आज अनेकांनी आपल्या उन्नतीचा मार्ग शोधला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
मंठा येथे मोरे पाटील परिवार व शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव २०२५ निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर शिवरायांचे सहकारी हिरोजी इंदलकर यांचे तेरावे वंशज श्री संतोष इंदलकर शिवचरित्रकार ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर, विकास इंदलकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संतोष इंदलकर यांना मोरे पाटील परिवाराच्या वतीने शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार तर शिवचरित्रकार ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवस्वराज्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी विविध क्षेत्रात नवनवीन उद्योग सुरू करून तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार व सन्मान देखील प्रेरणा पुरस्काराच्या रूपाने यावेळी करण्यात आला.
पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात, अफजलखानाचा कोथळा, शाईस्तेखानाची बोटे, आग्राहून सुटका.... पण भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यायला पाहिजेत. आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे, रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे, सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक", विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावूनजगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक", समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक", मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्यारात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे", ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था अत्यंत प्रभावीपणे राबवणारे "जलतज्ञ", ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचेकोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते", सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे, परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक", धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज अशी छत्रपती शिवाजी महाराजांची विविध रूपांचा अभ्यास आणि विचार प्रत्येकाने केला पाहिजे. असे मत यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यादृश्य हात शोधून आणून त्यांचा सत्कार करण्याचा मोरे पाटील परिवाराचा संकल्प अत्यंत प्रेरणादायी असून छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे दैवत असून काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना तिथीप्रमाणे करावी की तारखेप्रमाणे करावी अशा प्रकारचा वाद-विवाद करण्याचा प्रयत्न करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण महत्त्वाचा असताना अत्यंत संकुचित भावनेने शिवरायांचा विचार बघितला जातो हे अत्यंत खेदाची बाब असून तारखेप्रमाणे किंवा तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी किंवा नको याचा विचार करण्यापेक्षा वर्षातील 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तरी उपकार फिटणार नाहीत असे प्रतिपादन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांनी केले.
यावेळी हिरोजी आंबेडकरांचे तेरावे वंशज ही संतोष इंदलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना इंदुलकर चांगले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यतिथी निमित्त किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने सातत्याने फिरत असतो परंतु पारंपारिक पद्धतीने डीजे मुक्त असलेले अत्यंत अबूतपूर्व आणि अद्वितीय अशा प्रकारची शिवजयंती मोरे पाटील परिवाराच्या वतीने मंठा येथे साजरी केली जाते आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीचा उत्सव असाच अखंड सुरू राहावा अशी अपेक्षा संतोष इंदलकर यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज शोधून त्यांचा मान सन्मान करण्याचं अद्वितीय काम मोरे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे याचा इंदलकारांचा वंशज म्हणून मला अत्यंत अभिमान आहे असेही यावेळी संतोष इंदलकर म्हणाले.
मोरे पाटील परिवाराच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे हे सलग अठरावे वर्ष असून मागील सहा वर्षांपासून सामाजिक व इतर क्षेत्रात काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणारा महानुभवांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्या काळात प्रत्यक्ष काम करणाऱ्या मावळ्यांचे वंशज यांचा सन्मान आणि सत्कार केला जातो यापूर्वी अध्यात्मिक क्षेत्रात शिवरायांच्या विचारांचा जागर करणारे ह भ प बाळू महाराज गिरगावकर इतिहासाच्या क्षेत्रात काम करणारे कान्होजी जेधे यांची वंशज राजधिर जेधे वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे डॉ. ओमप्रकाश शेटे स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे वीर शिवा काशिद यांचे वंशज आनंदराव काशीद आणि साहित्य क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रकाशित इतिहास पुढे आणणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तेराव्या वंशज डॉ. शितलताई मालुसरे यांचा यापूर्वी सत्कार करण्यात आला असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक डॉ. कल्याण मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.
ज्या मान्यवरांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि नवीन उद्योगाची उभारणी करत तरुणाईला एक चांगला संदेश दिला अशा नवउद्योजकांना छत्रपती श्री शिवाजी महाराज नवउद्योजक प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये सुनीता नरवडे जालना, शकुंतला नागवे भाटेपुरी, नारायण वाशिंबे आष्टी, उद्धव शेरे परतुर, सुरेश कोल्हे आष्टी, सुनील वरकड मंठा, भागवत जगताप आष्टी, अनिल मुळे वाटूर फाटा, यशोदा खंडागळे कटाळा खुर्द, इंद्रायणी भुतेकर कटाळा बुद्रुक, मीरा उबाळे वाई, कैलास जाधव धोंडी पिंपळगाव, सरिता चव्हाण मेसखेडा, निर्मला सुभेदार संकनपुरी, श्रीकृष्ण टेकाळे आष्टी, मीना सोळंके सोयांजना या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्काराच्या माध्यमातून अधिकाधिक नवउद्योजक घडावेत त्यांना प्रेरणा मिळाली अशी अपेक्षा असल्याचे शिवजन्मोत्सवाचे आयोजक प्रा सहदेव मोरे पाटील यांनी स्पष्ट केले.
शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमात ५६ रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले. यावेळी अंकुशराव बोराडे अंकुशराव अवचार बाबुराव शहाणे गणेशराव खवणे सतीशराव निर्वळ पंजाबराव बोराडे राजेश मोरे कैलास बोराडे अजय अवचार, वैजनाथ बोराडे, नितीन राठोड, विठ्ठलराव काळे गणेशराव शहाणे गणेशराव बोराडे सुरेश सरोदे नागेश घारे मुस्तफा पठाण, अमोल मोरे, प्रसादराव गडदे बाबाजी जाधव जानकीराम चव्हाण सचिन राठोड आनंद जाधव नितीन सरकटे रामकिसन बोडखे परमेश्वर शिंदे मनोज देशमुख प्रकाश गबाळे सोपान वायाळ दत्तराव खराबे राजेभाऊ खराबे वसंत बागल रामकिसन मुसळे कैलास चव्हाण सुभाष बागल कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब पाटील मोरे, प्रा.सहदेव मोरे पाटील डॉ. कल्याण मोरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Ramkisan Bodakhe