दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड शहर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 40 वर्ष वयाच्या पुरुषाचा खून

दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 40 वर्ष वयाच्या पुरुषाचा खून करण्यात आला अनोळखी मयत पुरुषाची ओळख पटलेली नाही डोक्यात दगड मारून व तोंडावर गंभीर जखम करून जीवे ठार मारल्याचे पोलिसांकडून कळाले.

 सदर घटना ही दिघी पोलीस ठाणे येथे घडली असून सदर खुणाच्या तपासामध्ये आरोपी राजेश उदयसिंग याला 19/07/2025 रोजी अटक करण्यात आली असून सदर आरोपी याने 18/7/ 2025 रोजी रात्री 2.00 वाजता इंद्रायणी नदीवरील नवीन दर्शनबारीचा स्कायवॉल्क पुलाच्या खाली एका अनोळखी व्यक्तीसोबत त्याने आरोपीच्या पायावर दगड मारल्याने आरोपीने या अनोळखी इसमाच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले अशी कबुली आरोपीने दिली.

 सदर खुणाच्या तपासाच्या अनुषंगाने मयत अनोळखी व्यक्ती याचे बाबतीत अद्याप कोणतेही माहिती मिळालेली नाही दिघे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व स्टाफ सह इंद्रायणी घाटावरील लोकांकडे चौकशी केली असता इंद्रायणी घाटावरील दुकानदाराकडे चौकशी केली पोलीस ठाणे हद्दीतील लोकांना मयत त्याचे फोटो चौकशी केले इंद्रायणी घाट तसेच हद्दीतील अवैध्य दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे चौकशी केली सदर खुणाच्या तपासाच्या अनुषंगाने इंद्रायणी घाट परिसरातील योगीराज चौक कामगार चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले परंतु या मयत व्यक्ती बाबत कोणती माहिती अद्याप पोलिसांना मिळालेले नाही पुढील तपास पोलीस करत आहेत.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट