Breaking News
राजारामबापू पाटील दूध संघाचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री श्री .जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई शाखेच्या वतीने राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या रिक्षा चालक,बस चालक,ट्रॅफिक व मुंबईपोलीस,रुग्णालयातील रुग्णसेवक अशाच समाजातील विविध जनसेवकांना कृष्णाचे ताक वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी मुंबई शाखेचे राजेंद्र नगराळे व राहुल अलगुडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद केंजळे,अजय खवळे व इतर जण उपस्थित होते.सामाजिक भान ठेवून राजारामबापू पाटील दूध संघाच्या मुंबई शाखेच्या वतीने अशा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आल्यामुळे सर्व थरातून त्याचे कौतुक होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Santosh Sawant