आकुर्डे तालुका भुदरगड येथे वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धांना प्रारंभ..भुदरगडचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

आकुर्डे तालुका भुदरगड येथील आकुर्डे क्रीडा मंडळ आकुर्डे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .तर या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे प्रमुख उपस्थित होते .

      यावेळी बोलताना श्री लोंढे पुढे म्हणाले अलीकडच्या काळात मैदानावरची खेळण्याची परंपरा कमी झालेली आहे त्यामुळे मुलांच्या शारीरिक क्षमतेचा विकास होऊ शकत नाही अभ्यासाबरोबरच मुलांच्या शारीरिक क्षमतेचा विकास होणे ही काळाची गरज असून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला मैदानी खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे .आकुर्डे क्रीडा मंडळ आकुर्डी यांनी मैदानी खेळाची ही परंपरा जोपासली असल्याने भविष्य काळामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरचे कबड्डी खेळाडू या गावातून तयार होतील .यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले आकुर्डे गावामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून कबड्डी खेळाची परंपरा असून इथल्या मातीतले अनेक खेळाडू हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती चमकलेले आहेत भुदरगड तालुक्यामध्ये इतक्या वर्षाची कबड्डी खेळाची परंपरा जोपासणारे हे एकमेव गाव असून भविष्य काळामध्ये कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सुद्धा इथले खेळाडू चमकतील अशी इथली परिस्थिती आहे त्यामुळे आकुर्डी क्रीडा मंडळ आकुर्डे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.या कार्यक्रमास शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम,क्रीडा प्रशिक्षक प्रा शिवाजीराव चोरगे,मुख्याध्यापक प्रकाश पाटील सर, सुरेश पाटील सर,शंकराव जाधव सर,आकुर्डेचे उपसरपंच के एम कुपटे,शहाजी कुपटे,नामदेव कुपटे ,मोहन सूर्यवंशी ,लिंगराज स्वामी, धनाजीराव मोहिते नितीन कुंभार सागर पोवार,यांचे सह क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या स्पर्धेत 35 किलो गटाखालील वीस संघाने तर 70 किलो वजनी गटाखालील २० संघानी सहभाग घेतलेला आहे .अत्यंत दर्जेदार आणि दिमाखदार पद्धतीने या स्पर्धेचे संयोजन करण्यात आले असून या स्पर्धा तीन दिवस चालतील.स्वागत युवराज लोहार यांनी केले प्रस्ताविक सागर पवार यांनी केले आभार अजित कांबळे यांनी मानले.

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट