Breaking News
कारेगाव -लोणार तालुक्यामधील सुलतानपूर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे बांधकाम परवाना तत्काळ रद्द करण्यासाठी अतिक्रमण धारकांनी व नागवंशी पनाड यांनी उपनिबंधक तथा जिल्हाधिकारी यांना तक्रार निवेदन सादर केले.कार्यकारी सोसायटी ही मुळातच जे अतिक्रमण धारक 40 ते 50 वर्षापासून अतिक्रमण करून छोटे मोठे उद्योग-धंदे यांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्या अतिक्रमणधारकांना सहकारी संस्थेला अतिक्रमण काढण्याचा कुठलाही अधिकार नसतांना अतिक्रमण धारकांना बेकायदेशीररित्या नोटीस देत अतिक्रमण काढण्यासाठी विविध क्षेत्रामधून प्रेशर आणण्यात येत आहे असे अतिक्रमण धारक बोलत आहेत.विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी सर्व नियम धाब्यावर बसून व्यापारी संकलन बांधकामाचा परवाना मिळवला आहे. त्यामध्ये सोसायटीचे गोडाऊन एफ-क्लास जाग्यावर असल्याचे पुरावे सुद्धा जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हाधिकारी यांना दिले आहेत ग्रामपंचायतने सुद्धा कुठलाही ठराव नसताना बेकादेशीर रित्या न हरकत दिल्याचे पुरावे सुद्धा दिले आहेत.यासाठी जिल्हा उपनिबंधक जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळेस नागवंशी संघपाल पनाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, शेख अमीर भाई, दामु अण्णा सुरूशे, मधुकर खेत्रे, प्रदीप गाडेकर ,गजानन झोरे, सिद्धेश्वर खरात ,गजानन राजगुरू, राजू काळे, संतोष सुरूशे ,बबन बिडवे, पांडुरंग गाडेकर, अशोक खरात, राजेश पाटील, राजू रिंढे, फुलचंद शिराळे ,इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत व उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan