Breaking News
मुंबईतील सर्वच रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्याकरिता शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असून सुद्धा मुंबई, उपनगरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे तसेच रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश नारायण वराडे यांनी मुंबई महापालिकेत केली आहे. मनपा एस विभाग हद्दीतील एल. बी. एस. मार्गावरील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेले असून भांडुप (प.) येथील छत्रपती शिवाजी महाराज तलाव मार्गावर खड्डा पडल्याने दुचाकी वाहनचालकांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रहदारी करीत असलेल्या नागरिकांच्या जीवाला एक प्रकारे धोका निर्माण झाला असल्याने लवकरात लवकर भांडुप पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज तलाव मार्गावरील खड्डा आणि मनपा हद्दीतील एल. बी. एस. मार्गावरील ठिकठिकाणी पडलेल्या भेगा बुजवण्याची मागणी गणेश वराडे यांनी एस विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भास्कर कसगीकर यांच्याकडे केली आहे. तक्रार करुन सुद्धा समस्या सुटत नसल्याने प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोपही वराडे यांनी केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Pritam Tambe