कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये बाधित कुटुंबांच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगी येथील बाधित कुटुंबांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी  आमदार सतेज (बंटी) पाटील आणि मा.जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर येथे बैठक पार पडली.यामध्ये लक्ष्मीवाडी,गडमुडशिंगी येथील बाधित कुटुंबांतील ४७ पैकी ३१ कुटुंबिय अजूनही पुनर्वसनापासून वंचित आहेत भुसंपादन प्रक्रियेमध्ये खाजगी वाटाघाटीसाठी मुदतवाढ द्यावी,या प्रक्रियेमध्ये काही रहिवाशांना कोणताही मोबदला न देता सातबारा पत्रकावरून त्यांची नावे कमी करण्यात आली आहेत या महत्वाच्या आणि अशा अनेक समस्यांवर चर्चा झाली. 

यावेळी मा.जिल्हाधिकारीसो यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याचा पाठपुरावा करण्याबाबतच्य़ा सुचना देऊन बाधित नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शशिकांत खोत,माजी सदस्य बाबासो माळी,शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर तसेच रावसाहेब पाटील,संजय पाटील,अरविंद शिरगावे,सागर सोनुले,विलास सोनुले,शिवाजी सोनुले यांच्यासह विमानतळ परिसरातील बाधित नागरीक व विविध खात्याचे शासकिय अधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट