हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भगवानराव चके यांनी केला पत्रकारांचा सन्मान
कारेगाव :- लोणार तालुक्यामधील सुलतानपूर येथे दिनांक २६.०१.२०२५ रोजी दुपारी १ (एक) वाजता हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते फोटो पुंजन करुन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या जयंतीच्या निमिंत्ताने पत्रकाराचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाला पत्रकार मोठ्याया संख्येने उपस्थित होते.त्यापैकी काही पत्रकाराने बोलताना सांगितले की हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे हे एक पत्रकार होते व त्यांची पत्रकारिता ही एक निर्भीड व पारदर्शक होती असे अनेक पत्रकारांनी या निमित्ताने आपल्या भाषणातून आपले मत मांडले.भगवानराव चके यांनी आपल्या भाषणांमधून बाळासाहेबांची खरी प्रतिमा उभी केल्यासारखे बाळासाहेबांन विषयी मनोगत व्यक्त केले. त्यांनी बाळासाहेबांना विनम्र होऊन अभिवादन करून त्यांच्यात असलेल्या कार्याचा आणि शैलीचा आपल्या भाषणामधुन अनेक प्रसंग सांगून त्यांच्या कार्याची व जीवनशैली आपल्या भाषणातून खंत ही व्यक्त केली.आपण सर्वांनी व पत्रकारांनी मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील त्यांचे कार्य त्यांची शैली त्यांचे काही निर्णय घेण्याची क्षमता ही आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारली तरच त्यांना या दिवसाची खरी- खुरी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे होईल असे उद्गार आपल्या भाषणातून भगवानराव चके यांनी व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
Testing
- 15 March, 2024
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan