लोणार शहरात शेकडोंचा मूक मोर्चा
कारेगाव : - बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्याचप्रमाणे सकल समाज बांधवाच्या वतीने १३ जानेवारी रोजी लोणार येथे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.
लोणार येथे स्थानिक बसस्थानक समोर सकाळी 11 वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. लोणार तहसिल कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या प्रकरणाशी संबंधित लोकांवर खुनाचे गुन्हे दाखल करावेत, तसेच दोषी पोलीस अधिकारी बडतर्फ करावेत, अशा मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
Testing
- 15 March, 2024
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan