शिवभक्त अभिजित रजनी दिलीप सांगळे यांना महाराष्ट्र शिवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट)नवी मुंबई यांच्या माध्यमातून नविन वर्षाची सुरुवात ही समाजातील समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना गौरविण्यात आले. 

आजवर श्री छत्रपती शिवराय आणि छत्रपती श्री शंभुराय यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन जवळ जवळ १५ हजारांपेक्षा जास्त नाविक तसेच शिक्षणाकरिता परदेशात गेलेले विद्याथीं यांना कोविडच्या काळात परदेशातून

भारतात सुखरूप परत आणण्यात आमच्या ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन ला जे यश आलेले होते त्याचप्रमाणे अजून देखील बाहेर देशात कुठल्याही नाविक किंवा विद्यार्थी यांना काहीही अडचण निर्माण झाली की त्यांची मदत आपण आपल्या युनियन मार्फत त्वरित निरंतरपणे करत आहात. यामध्ये प्रामुख्याने इराण, दुबई, सायप्रस, तुर्की, मलेशिया, इंडोनेशिया, नायझेरिया यासारख्या देशातून अडचणीमध्ये असलेल्या नाविकांना व विद्यार्थ्यांना सोडविण्यात जे आम्हाला यश आलेले आहे आणि आज ते त्यांच्या परिवारासोबत आनंदात जीवन व्यतीत करत आहेत. आमच्या या शिवकार्याची दखल केंद्रीय मंत्रालय तसेच गृह आणि विदेश मंत्रालय, भारत सरकार यांनी देखील घेतलेली आहे व आमची प्रशंसा केली आहे.

राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट)नवी मुंबई शिवरत्न सन्मान पुरस्कार साठी व छत्रपती श्री शिवराय आणि धर्मवीर छन्रपती श्री शंभूमहाराजांच्या प्रती जनजागृती तसेच महाराजांनी आपल्यासाठी काय काय त्यांग केलेला आहे, महाराज जर जन्माला आले नसते तर आपले काय झाले असते याची प्रत्यक्षात जाणीव आपण समाजाला करुन दिलेली आहे. आपल्या शिवकार्यातून गेले १ दशक "श्री शिवामृत" आपण या जगाला पाजत आला आहात. समाजाच्या मनात शिवज्योत सतत तेवत ठेवण्यास आपण प्रेरणादायी आणि अत्यंत महत्वाचा दूवा ठरलेला आहात, आपले हे शिवकार्य अतिशय अनमोल आहे म्हणूनच मा. श्री. अभिजीत रजनी दिलीप सांगळे यांना छत्रपती श्री शिवप्रभूंकडून दिनांक १ जानेवारी, २०२५ रोजी श्री क्षेत्र दुर्गराज किल्ले श्री रायगडावरील पावन सदरेवर "शिवरत्न" या उपाधीने गौरविण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Govardhan Bhihade
    Govardhan Bhihade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Govardhan Bhihade

संबंधित पोस्ट