Breaking News
भुदरगड तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा संत सद्गुरु बाळूमामा मंदिर आदमापूर या ठिकाणी ते दर्शनासाठी आले होते .राम शिंदे सकाळी औंध इथून हेलिकॉप्टर मधून गारगोटीतल्या मौनी विद्यापीठाच्या पटांगणावरआगमन झाले . मौनी विद्यापीठ गारगोटी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हेलिपॅड तयार करण्यात आलेले होते. यावेळी सभापती प्रा राम शिंदे यांचे स्वागत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेएन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सूळ गटविकास अधिकारी शेखर जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले . महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष ऐश्वर्या पुजारी सरचिटणीस सुजाता थडके सौ विद्यादेवी पाटीलयांनी प्रा राम शिंदे यांचे औक्षण करून स्वागत केले .
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगुले संतोष पाटील रवींद्र कामत बाजीराव देसाई रमेश रायझादे भाऊ कोगनुळकरशिवसेनेचे तालुकाप्रमुख संग्राम सावंत विक्रम आबिटकर गारगोटी ग्रामपंचायत सरपंच प्रकाश वासकर उपसरपंच सागर शिंदे ग्रा.प सदस्य राहुल चौगुले राहुल जाधव रणजीत आडके प्रताप चौगुले मोहन सूर्यवंशी बाळासाहेब देसाई नंदकुमार शिंदे डॉ . सुभाष जाधव यांचे सह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी मोटारीने आदमापूर तालुका भुदरगड येथे प्रस्थान केले .आदमापूर येथे बाळूमामा मंदिराचे अध्यक्ष धैर्यशील भोसलेसंदीप मगदूम दत्तामामा पाटील दिनकरराव कांबळे भाजपाचे लहू जरग जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे वसंतराव प्रभावळे पांडुरंग वायदंडे संजय भोसले वीरकुमार पाटील अनिल पाटील रामभाऊ पाटील कपिल फराकटेआदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी सभापती राम शिंदे यांनी सहकुटुंब श्री संत बाळूमामाच्या समाधीचे दर्शन घेतले .
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Rupesh Adolikar