Breaking News
साखरखेर्डा ( वार्ताहर )
संसद भवनात निवेदन सादर करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेले विधान हे आंबेडकरी अनुयायी यांच्या भावना दुखावण्याचा हेतू असून अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी , अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच कमलाकर गवई यांनी आज २३ डिसेंबर रोजी साखरखेर्डा बसस्थानकावर निषेध आंदोलन करताना दिला .
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंबेडकर अनुयायी आणि महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी साखरखेर्डा बसस्थानकावर आले . त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत अमित शहा यांचा निषेध केला . डॉ बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी देवच असून इतर कुणाचे नाव घेऊन आम्हाला काय मिळणार ! बाबासाहेब यांच्यामुळे जे काही आम्हाला मिळाले ते कोणीही देऊ शकत नाही . आणि आमचा हक्क सुध्दा हिरावून घेऊ शकत नाही . भाजपाच्या सरकारमध्ये अनेक खासदार बाबासाहेब यांच्या बद्दल अपमान कारक उद्गार काढून आमच्या भावनेला ठेच पोहचत आहेत . हे आता सहन करणार नाही . लोकशाहीच्या माध्यमातून आमचे आंदोलन सुरुच राहील असा इशारा सुध्दा यावेळी आंदोलकांनी दिला . यावेळी ठाणेदार गजानन करेवाड यांना माजी सरपंच कमलाकर गवई , दिलीप आश्रू इंगळे , सुभाष गवई , माजी उपसरपंच दर्शन गवई , माजी केंद्रप्रमुख दिलीप खंडारे , दादाराव गवई , संदीप खिल्लारे , अरुण नामदेव गवई , गजानन गवई , शालिग्राम गवई, आकाश मधुकर गवई, अजय सरकटे , ईश्वर गवई ,माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत , रफीक तांबोळी , त्रिभुवन गवई , सुधाकर गवई , अजय गवई यांनी निवेदन सादर करून निषेध केला . यावेळी शेकडो बांधव सहभागी झाले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Darshan Gavai