Breaking News
कवी-लेखक,सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या वाढदिवसानिमित्त पवना हाॅस्पीटल यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुणे : प्रतिनिधी काळुराम घोडके - राजगुरुनगर येथे कवी-लेखक व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या वाढदिवसानिमित्त पवना हाॅस्पीटल सोमाटणे फाटा,श्री हाॅस्पीटल राक्षेवाडी यांच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. रक्तदाब,मधुमेह,इसीजी अशा सर्व रोग तपासणी झाली.मणक्याचे विकार,हृदयरोग या गंभीर आजारांवरील रुग्णांची तपासणी करून त्यातील काही रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी पवना हाॅस्पीटल येथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी १७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली
कार्यक्रमाला पवना हाॅस्पीटलच्या कार्यकारी संचालिका डाॅ.वर्षाताई वाढोकर,ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे,मनविसेचे जिल्हाप्रमुख समीर थिगळे,पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले,बहुळच्या सरपंच अश्विनी साबळे,कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी,गोसासीचे सरपंच संतोष गोरडे,अंबिका देवस्थान चे अध्यक्ष संतोष शेटे,कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीपराव चौधरी,सचिव सुभाषराव गोरडे,भाजयुमो पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष जयदीप कर्पे,बहुळ सोसायटी मा.चेअरमन पंकज हरगुडे,बहुळ तंटामुक्त समिती अध्यक्ष माऊलीभाऊ साबळे,युवा नेते संदीपभाऊ साबळे,भाजपचे खेड ता.उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे,उद्योजक जयप्रकाश दौंडकर,ॲड.सुहास दौंडकर,कनेरसर सोसायटी संचालक काळुराम दौंडकर,पवना हाॅस्पीटलचे समन्वयक संपत गोरे,डाॅ.स्नेहा बेहरे,डाॅ.रूषभ अंबलकर,डाॅ.नंदा शिंगाडे व सहाय्यक टीम उपस्थित होती.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी पवना हाॅस्पीटल च्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून रूग्णसेवेचे व्रत जोपासता आले असे मत व्यक्त केले.पवना हाॅस्पीटलच्या कार्यकारी संचालिका डाॅ.वर्षाताई वाढोकर,सरपंच अश्विनी साबळे,पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले,खेड पो.स्टेशनचे ड्युटी ऑफीसर संतोष घोलप यांनी मनोगत मांडले. संतोष गोरडे यांनी सूत्रसंचालन केले.
आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल सर्वांनी कौतुक केले.बबनराव पडवळ व राजाराम दौंडकर यांच्या शस्त्रक्रिया पवना हाॅस्पीटल मध्ये मागील महिन्यात यशस्वी रित्या पार पाडल्या होत्या.त्यांनीही पवना हाॅस्पीटलबद्दल कौतुकोद्गार काढले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake