Breaking News
प्रतिनिधी - वसईत ३५ वा तालुका कला क्रीडा महोत्सव 2024 संपन्न झाला. वसई ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये वसईच्या क्षितिज आणि स्वराज राजेश सातघरे या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून वय वर्षे १४ आणि वय वर्षे १७ खालील समूहामध्ये कांस्य पदक जिंकले. घवघवीत यश संपन्न करणारे दोघेही सातघरे बंधू वसईच्या शटल स्मॅशर बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. याआधी देखील त्यांनी विविध स्तरावरील ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. शटल स्मॅशर अकॅडमीच्या खेळाडूंची सर्व खेळाडूंनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवले. त्यांच्या या चमकदार कामगिरीमुळे वसई परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे संस्थापक व प्रशिक्षक अभिनव सिंग आणि प्रज्वल सिंग यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून, भविष्यातही खेळाडू अधिक उच्च स्तरावर चमकतील, अशी त्यांना अपेक्षा व्यक्त केली आहे. क्षितिज आणि स्वराज राजेश सातघरे यांच्या पुढील वाटचालीसाठी स्थानिक नागरिक आणि सातघरे परिवार कडून शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Pritam Tambe