Breaking News
मंठा शहराचे विद्यमान नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, नगरसेवक नितीन राठोड, तसेच नगरसेवक विकास सूर्यवंशी यांनी आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन तसेच भारतीय जनता पक्षाचा रुमाल देत भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या सर्वांना पक्षप्रवेश दिला.
यावेळी सतीश निर्वळ पंजाबराव बोराडे शेषनारायण दवणे अमोल मोरे रामकिसन बोडखे अभिजीत कोदंडे, अरुण वाघमारे बाज खा पठाण शेख साजिद नगरसेवक राजेश खंदारे सुजित जोगस प्रकाश घुले, गजानन उफाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Ramkisan Bodakhe