स्व.जे.डी.भुतडा कलानिकेतनचा विद्यार्थी बुद्धिळमध्ये तालुकास्तरीय प्रथम

                 कारेगाव - स्व.जे. डी. भुतडा कलानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कारेगांव फाटा  येथील विद्यार्थी यश दिलीप अंभोरे याने १७ वर्ष वयोगटातील बुद्धिबळ (चेस ) स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम विजेतेपद पटकावून जिल्हास्तरासाठी पात्र ठरला आहे.

     अधिक वृत्त असे की, शालेय क्रिडा स्पर्धा अमरावती विभाग अंतर्गत तालुकास्तरिय खेळाचे आयोजन दि . 22/08/2025 रोजी सेन्ट्रल पब्लीक स्कूल लोणार येथे आयोजन करण्यात आले होते.यात स्व . जे. डी. भुतडा कलानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कारेगांव फाटा ता . लोणार जि . बुलडाणा चा विद्यार्थी यश दिलीप अंभोरे वय गट 17 वर्ष खाली हा विद्यार्थी बुद्धीबळ ( चेस ) या स्पर्धेत तालुकास्तरातुन प्रथम येवून जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र ठरला आहे . जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री डॉ श्रीरामजी भुतडा साहेब, सचिव श्री एम.एस . भुतडा सर मुख्याध्यापिका कु. एस . टी. दुंड्यार मॅडम यांच्यासह प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यश चे कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट